ग्रामपंचायत नाटे कार्यालयाजवळ १,००,००० लीटर साठवणक्षमतेची सार्वजनिक टाकी आहे. या टाकीमध्ये श्री नाटेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या सार्वजनिक विहिरीतून पाणी येते व सडापेठ, नजफनगर, बांदकरवाडी आणि डुबिलकरवाडी या वाड्यांना पाणीपुरवठा होतो.
नाटे मुख्य विहीर
ग्रामपंचायतीजवळील १,००,००० लीटरची टाकी
गणेशनगर आणि बौद्धवाडी या वाड्यांसाठी गणेशनगर येथे एक स्वतंत्र विहीर आणि २५००० लीटर क्षमतेची साठवण टाकी आहे.
गणेशनगर विहीर
गणेशनगर साठवण टाकी
पडवणेवाडी येथे एक सार्वजनिक विहीर व १०००० लिटर क्षमतेची साठवण टाकी आहे. येथील श्री मठेश्वर मंदिर येथील बारमाही झऱ्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते.
पडवणेवाडी - विहीर
पडवणेवाडी साठवण टाकी
श्री मठेश्वर मंदिर येथील बारमाही झरा
कोकरीवाडीसाठी जल जीवन मिशन अंतर्गत सड्यावर नवीन विहीर बांधण्यात आली आहे व ५००० लि. क्षमतेच्या २ साठवण टाक्या आहेत.
कोकरीवाडीला पाणीपुरवठा करणारी विहीर
कोकरीवाडी - साठवण टाक्या
बांदचा वाडा येथे पाणीपुरवठा करण्यासाठी दोन सार्वजनिक विहिरी आणि १४००० लीटर क्षमतेची साठवण टाकी आहे.
बांदचा वाडा - विहीर - १
बांदचा वाडा - विहीर - २
साठवण टाकी
नाटे महसुली गावातील भराडीण वाडी येथील कुंभारवाडी, मधलीवाडी आणि पोकळेवाडी या वाड्यांसाठी प्रत्येकी १ सार्वजनिक विहीर आहे. तसेच पोकळेवाडी येथे सार्वजनिक बोअरवेल आहे.
कुंभारवाडी येथील सार्वजनिक विहीर
कुंभारवाडी - सार्वजनिक टाकी - ५००० ली.
मधलीवाडी - सार्वजनिक विहीर
मधलीवाडी - साठवण टाकी
पोकळेवाडी - सार्वजनिक विहीर - पिण्यासाठी
पोकळेवाडी - बोअरवेल व साठवण टाक्या - इतर वापरासाठी
भराडीण या महसुली गावातील थळेश्रीवाडी आणि बाणेवाडी या वाड्यांमध्ये प्रत्येकी १ सार्वजनिक विहीर आहे. साळवीवाडी येथे बोअरवेल आहे.